पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सायंकाळी पांच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 89.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
आज शनिवारी सायंकाळपर्यंत काेयनानगर येथे 15 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 34 आणि महाबळेश्वरला 43 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धारणामध्ये 9 हजार 876 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. दरम्यान, धरणातील पाणीसाठा 84.63 टक्के झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी आहे. तर सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
1 जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे 5 हजार 037 मिलिमीटर झाले आहे. यानंतर महाबळेश्वरला 4 हजार 805 आणि कोयनानगर येथे 4 हजार 259 मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस कमी झाल्याने धरणातही पाण्याची आवक कमी होत आहे.
Koyna Dam
Date: 10/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2150’11” (655.599m)
Dam Storage:
Gross: 89.07 TMC (84.63%)
Live: 83.95 TMC (83.84%)
Inflow : 9,876 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 15/4259
Navaja- 34/5037
Mahabaleshwar- 43/4805