पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरण भरण्यासाठी अजून 18 टीएमसी पाण्याची गरज आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस पडल्यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, आॅगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आज शनिवारी सकाळपर्यंत काेयनानगर येथे 20 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 23 आणि महाबळेश्वरला 53 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात 9 हजार 504 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 88.65 टीएमसी झालेला. धरणातील पाणीसाठा 84.23 टक्के झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी आहे. तर सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
Koyna Dam
Date : 10/08/2024
Time : 08:00 AM
Water level : 2150’07” (655.498m)
Dam Storage :
Gross : 88.65 TMC (84.23%)
Live : 83.53 TMC (83.42%)
Inflow : 9,504 Cusecs.
Discharges
Radial Gate : 00 Cusecs : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna- 20/4244
Navaja- 23/5003
Mahabaleshwar- 53/4762