पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी अजून काही भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली असून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ टीएमसी पाण्याची गरज आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात सर्वत्रच धुवाधार पाऊस पडल्यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाणी प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. पण, आॅगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत काेयनानगर येथे 07 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 12 आणि महाबळेश्वरला 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे 4 हजार 992 मिलिमीटर झाले आहे. यानंतर महाबळेश्वरला 4 हजार 744 आणि कोयनानगर येथे 4 हजार 231 मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस कमी झाल्याने धरणातही पाण्याची आवक कमी होत आहे.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कोयना धरणात 7 हजार 152 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 88.22 टीएमसी झालेला. धरणातील पाणीसाठा 83.82 टक्के झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी असल्याने गुरूवारी सकाळपासून पायथा वीजगृहातील २ हजार १०० क्यूसेक विसर्गही थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद झालेला आहे.
Koyna Dam
Date: 09/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2150’03” (655.396m)
Dam Storage:
Gross: 88.22 TMC (83.82%)
Live: 83.10 TMC (82.99%)
Inflow : 7,152 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 07/4231
Navaja- 12/4992
Mahabaleshwar- 35/4744