कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी; धरणातील पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण लवकर भरण्याच्या स्थितीत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही घटली आहे. त्यामुळे सायंकाळी 5 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार 86.93 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता कोयनानगरला 12, नवजाला 28 तर महाबळेश्वरला 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होवू लागली आहे.

कोयना धरणाचे दरवाजे 12 दिवसानंतर बंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणात देखील पाणीसाठा हळूहळू होऊ लागला आहे. दरम्यान, मंगळवारी 12 दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले.

10 दिवस पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला

जुलै महिना उजाडल्यानंतर पावसाने थैमान घातले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस आॅगस्ट महिना उजाडेपर्यंत सुरू होता. यामध्ये जुलैच्या मध्यावर सलग 10 दिवस पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे दरडी कोसळल्या, ओढे-नाल्यांना पूर आले. यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला. परिणामी पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच धरणांतील पाणीसाठाही वेगाने वाढला. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागलेला.

Koyna Dam

Date: 07/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2148’11” (654.990m)

Dam Storage:
Gross: 86.93 TMC (82.59%)
Live: 81.81 TMC (81.70%)

Inflow : 8,998 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 2100 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 12/4202
Navaja- 28/4938
Mahabaleshwar- 19/4669