पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे. या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण लवकर भरण्याच्या स्थितीत आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 47 हजार 336 क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती.

शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. रविवारीही पायथा वीजगृहातून 2 हजार 100 आणि सहा दरवाजांतून 52 हजार 100 क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील २० दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे.

Koyna Dam

Date: 04/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2148’07” (654.888m)

Dam Storage:
Gross: 86.63 TMC (82.31%)
Live: 81.51 TMC (81.40%)

Inflow : 47,336 Cusecs.

Discharges
Radial Gate: 50,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 52,100 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 59/4087
Navaja- 46/4747
Mahabaleshwar- 102/4553