सातारा जिल्ह्यात पावसाचा लपंडाव; कोयना धरणात किती पाणीसाठा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात कोयना पाणलोट क्षेत्रात आज पावसाने कमी हजेरी लावली. मात्र, संततधारेमुळे धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची अवाक झाली आहे. सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी कोयना धरणात आज सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 84.99 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाण्याची अवाक झाल्याने धरण 80.75 टक्के भरले आहे.

सातारा जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी पावसाने उघडीप दिली होती. मात्र, रविवारी पुन्हा जोर धरला. पश्चिमेकडील तालुक्यात धुवाँधार पाऊस झाल्यामुळे हरणामध्ये पाण्याची आवक झाली. मात्र, आज सोमवारी पावसाने लपंडाव केला. संतधारपने कोसळत पावसाने अल्पशी हजेरी कोयना पाणलोट क्षेत्रात लावली.

आज सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने कमी हजेरी लावली. त्यामुळे धरण 80.75 टक्के भरले असून धरणात 36 हजार 646 क्युसेक्स पाण्याची आवक झाली. तर धरणातून एकूण 32 हजार 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. आज दिवसभरात कोयनेत 35, नवजामध्ये 14 तर महाबळेश्वरत 55 मिलि मीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

Koyna Dam

Date: 29/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2146’09” (654.329m)

Dam Storage:
Gross: 84.99 TMC (80.75%)
Live: 79.87 TMC (79.77%)

Inflow : 36,646 Cusecs.

Discharges
Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 35/3511
Navaja- 14/4069
Mahabaleshwar- 55/3810