रात्रभर मुसळधार पाऊस; कोयना धरणात 84.85 TMC पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, पूर्वेकडील महापूराची स्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सद्या कोयना धरणात 84.85 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 80.62 टक्के भरले आहे.

कोयना धरणातील सहा दरवाजातून ३० हजार, तर पायथा वीजगृहाच्या दोन्ही युनिटमधून २ हजार १०० असा एकूण ३२ हजार १०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढली आहे. तर सायंकाळी पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगर येथे 71 , तर नवजाला 67 आणि महाबळेश्वर येथे 93 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Koyna Dam

Date: 29/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2146’07” (654.279m)

Dam Storage :
Gross: 84.85 TMC (80.62%)
Live: 79.73 TMC (79.63%)

Inflow : 38,014 Cusecs.

Discharges
Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs

Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna- 71/3476
Navaja- 67/4055
Mahabaleshwar- 93/3755