पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असून जिल्ह्यातील धरण, तलावामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, दोन दिवसापासून कराडसह पाटण तालुक्यात पावसाच्या रिमझिम श्री कोसळू लागल्या आहेत. कोयना धरणात आठवडाभरात 3. 5 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची भर पडली असून असून धरणात सध्या 84. 17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणात आज, रविवार, दि. 20 सकाळी 8 वाजेपर्यंत 84.17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला – 18, नवजा – 38 व महाबळेश्वरला – 66 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. तसेच आतापर्यंत कोयनेला – 3 हजार 311, नवजा – 4 हजार 715 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 440 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 2 हजार 586 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
कोयना धरणात आज 84.17 टीएमसी पाणीसाठा झाला असला तरी गेल्या 15 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अअवघ्या 3.5 टीएमसी इतकी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर या उलट जिल्ह्यातील माण – खटाव, कोरेगाव उत्तर भागात पावसाअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याचे दिसून येत आहे. येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस नसल्यामुळे या तालुक्यात टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. परिणामी येथील शेतकऱ्याकडून खटाव- माण तालुक्यातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.