सातारा प्रतिनिधी । राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम हा सध्या समाप्तीच्या मार्गावर आहे. ऊस गाळपामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते कारखाने. चालू वर्षी राज्यात २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते त्यापैकी ४ साखर कारखाने बंद झाले आहेत.
दररोज राज्यात ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रिक टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत असून चालूवर्षी ऐन पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने उसाची किमान वाढ झालेली नाही. उसाचे पर्यायाने साखरेचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येत असल्याने अंतिम टप्प्यात कारखानदारांकडून उपलब्ध उसाच्या गाळपासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
१३ फेब्रुवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात कोल्हापूर विभाग ऊस गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागात ४० कारखान्यांद्वारे १८० लाख ५४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. गतवर्ष २०२२-२३ च्या हंगामात १३ फेब्रुवारी अखेर २०७ कारखाने सुरू होते. त्यांनी ८६५ लाख ९६ हजार टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले होते. तर ९.८३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ७७६ लाख ८७ हजार क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते. मात्र, चालूवर्षी साखर उत्पादनात घट झाली आहे.
‘या’ विभागात झाले इतके साखरेचे उत्पादन
1) कोल्हापूर – १८०.५४ ऊस गाळप (लाख मे.टन), २०१.६५ (लाख क्विंटल), ११.१७ (टक्के)
2) पुणे – १६९.३२ ऊस गाळप (लाख मे.टन), १७१.०५ (लाख क्विंटल), १०.१ (टक्के)
3) सोलापूर – १६८.७८ ऊस गाळप (लाख मे.टन), १५२.१९ (लाख क्विंटल), ९.०२ (टक्के)
4) अहमदनगर – ९९.८२ ऊस गाळप (लाख मे.टन), ९४.९८ (लाख क्विंटल), ९.५२ (टक्के)
5) छत्रपती संभाजीनगर – ७४.१८ ऊस गाळप (लाख मे.टन), ६३.०१ (लाख क्विंटल), ८.४९ (टक्के)
6) नांदेड – ८८.१७ ऊस गाळप (लाख मे.टन), ८६.०८ (लाख क्विंटल), ९.७६ (टक्के)
7) अमरावती – ७.३५ ऊस गाळप (लाख मे.टन), ६.६८ (लाख क्विंटल), ९.०९ (टक्के)
8) नागपूर – २.४९ ऊस गाळप (लाख मे.टन), १.२३ (लाख क्विंटल), ४.९४ (टक्के)