‘कोयने’च्या दरवाजाला पाणी; धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

0
485
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही धरणात पाणी आवक होत आहे. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठा 73.03 टीएमसी इतका झाला असून त्यामुळे धरणाच्या दरवाजाला पाणी लागण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून दरवाजा उघडून विसर्ग केला जाणार आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यत आलेल्या आकडेवारीनुसार कोयनानगर येथे 21, नवजा 45 आणि महाबळेश्वरला 43 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे 2 हजार 176, नवजा 1 हजार 993 आणि महाबळेश्वरला 2 हजार 56 मिलिमीटर पाऊस पडला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी आवक कायम आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात 8 हजार 102 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 73.03 टीएमसी झालेला. त्यामुळे आता धरणातील पाणी दरवाजाला स्पर्श करू लागले आहे. कारण, ७३ टीएमसीला कोयनेतील पाणी दरवाजाला लागण्यास सुरूवात होते.

सध्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्यूसेक विसर्गच सुरू आहे. जून महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. त्यानंतर मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ पश्चिम भागाला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाची संततधार होती. यामुळे लवकरच धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांत ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान म्हणजे १०३ टीएमसी साठा निर्माण झाला आहे.

Koyna Dam

Date: 12/07/2025, 8:00 AM
Water level: 2133’04”
(650.240m)

Gross Storage: 73.03 TMC (69.39%)

Inflow : 8,102 Cusecs.
(0.70 TMC)

Discharges-
KDPH : 2100 Cusecs.

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 21/2176
Navaja- 45/1993
Mahabaleshwar- 43/2056