पाटण तालुक्यातील 7 हजारहून अधिक 7/12 वर चुकून लागलेला तुकडा शेरा होणार कमी; दुरुस्ती मोहिमेस झाली सुरुवात

0
147
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात अनेक वर्षांपासून चुकून इतर हक्कत तुकडा नोंद आहे. तथा 7/12 वर 50 गुंठे जमीन आहे, सदर क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त असल्याने यावर लागलेली तुकडा नोंद चुकून लागलेली आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे तसेच सुधारणेचे प्रस्ताव पाटण तालुक्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी तयार केले आहेत. त्याची तहसील कार्यालयातील महसूल विभागामार्फत कार्यवाहीची मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. सदर आदेशाचा फेरफार घेऊन 7/12 वरील नोंदी गाव निहाय कमी केल्या जाणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी पाटण यांचे आदेशानुसार 7/12 वरील इतर हक्कात तुकडा नोंद असलेले 7/12 ची तपासणी सुरु करण्याचे काम सध्या तहसील प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेले आहे. यामध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र आहे, परंतु चुकून इतर हक्कत तुकडा नोंद आहेत त्यांचे प्रस्ताव मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचेकडून प्राप्त करून, तहसील कार्यालय मार्फत आदेश निर्गमित केले जाणार आहेत.

प्रशासनाच्या या मोहिमेमुळे व तुकडा दुरुस्तीमुळे शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार आहे तसेच त्यांची कागदोपत्री अडचण मधून सुटका होणार आहे. यासाठी शेतकरी /खातेदार यांना अर्ज करायची आवश्यकता नाही. सर्व कामकाज प्रशासकीय पातळीवर केले जाणार आहे. त्यामुळे कोणताही त्रास न होता पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

प्रशासनाच्या या मोहिमेचा शेतकऱ्यांना नक्की फायदा : तहसीलदार अनंत गुरव

पाटण तालुक्यातीळ शेतकऱ्यांचे 7/12 वरील इतर हक्कात तुकडा नोंद असलेले प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर सध्या आम्ही एक मोहीम सुरु केली असून या मोहिमेतून शेतकऱ्यांचे 7/12 वर 50 गुंठे जमीन आहे, सदर क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त असल्याने यावर लागलेली तुकडा नोंद चुकून लागलेली आहेत. त्यांची दुरुस्ती करत आहोत. सदर काम हे मोहीम स्वरूपात पुढील 15 दिवस राबवले जाणार असल्याची प्रतिक्रिया पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.