कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार; कोयना धरणात 66.17 TMC ‘इतका’ झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असून आज सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 66.17 टीमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयनेला 61 तर नवजा येथे 37 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 58 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक झाल्यामुळे पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

गेल्या चार दिवसांपासून कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस झालयामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभरात 61 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात प्रतिसेकंद 50 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात 66.17 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 793 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 265 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 702 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारापर्यंत 49 हजार 452 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

कोयना धरणाच्या पायथा वीज गृहाच्या दोन पैकी एक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हा सर्वसाधारण विसर्ग आहे. धरणाच्या दरवाजातून हा विसर्ग करण्यात आला नसून पावसाळ्याचा उर्वरित कालावधीत विचारात घेऊन हा अल्पसा जलविसर्ग सुरु करण्यात आला आहे. तरीही खबरदारी म्हणून कोयना – कृष्णा नद्यांकाठी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Koyna Dam

Date : 23/07/2024
Time : 05:00 PM
Water level : 2125’07” (647.878m)

Dam Storage :
Gross : 66.17 TMC (62.87%)
Live : 61.05 TMC (60.97%)

Inflow : 49,452 Cusecs.

Discharges
KDPH : 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River : 1050 Cusecs

Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna – 61/2793
Navaja – 37/3265
Mahabaleshwar – 58/2702