साताऱ्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी, डीजे मालकांवर 63 खटले दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाणेकडून गणेशोत्सवात गणेश आगमन सोहळा ते गणेश विसर्जन सोहळयाच्या दरम्यान गणेश मंडळे, त्याचे अध्यक्ष व डॉल्बी मालक यांचेकडून ध्वनी प्रदुषण कायदयाचा भंग केल्यामुळे एकूण 63 खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

सातारा शहरामध्ये गणेशोत्सव 2024 च्या अनुशंगाने गणेश आगमन ते विसर्जन दरम्यान शाहुपूरी पोलीस ठाणे हदिदत निघालेल्या गणेश मंडळाच्या मिरवणुका दरम्यान मंडळे व मंडळाचे कार्यकर्ते डॉल्बी मालक चालक यांनी त्यांच्या मंडळाचे मिरवणुका सार्वजनिक रस्त्यावर जाणीवपूर्वक रेगांळत ठेवणे, जोरजोरात व कर्ण कर्कश्य असे लाऊड स्पिकर वाजवणे त्याच बरोबर जवळपास राहणा-या व येणा-या जाना-या लोकांना अडथळा, गैरसोय, त्रास, धोका पोहचु नये म्हणुन मनाई केलेली असताना देखील व या सर्व गोष्टी न करणेबाबत शाहुपूरी पोलीसांनी लेखी सुचना दिल्या.

मात्र, मिरवणुकीमधे व मिरवणुकीच्या मार्गात जोरजोरात डॉल्बी स्पिकर लावुन लोकाना त्रास होईल असे वर्तन केले म्हणुन 32 सार्वजनीक गणेश मंडळे व 28 डॉल्बी मालक चालक असे एकुण 63 लोकांवर कारवाई करणेत आली आहे व त्यांचे विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम 36 (ई), 33 (न) प्रामाणे खटले दाखल करून न्यायालयात सदरचे खटले सादर करणेत आलेले आहेत.