कराड प्रतिनिधी | शहरातील भर वस्तीतील बुधवार पेठेत बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एका घरात स्फोट झाला. या घटनेत सहा जण भाजले आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याची वार्ता शहरभर झाली अन् प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, हा सिलेंडरचा स्फोट नसून पंख्याचा कंडेंसर तापून फुटल्याने मोठा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजामुळे छोट्याशा खोलीतील लोक हडबडले आणि गॅस शेगडीच्या ज्वाळांमुळे चौघांच्या कपड्यांनी पेट घेतल्याने ते भाजले.
स्फोटात सहा जण भाजले
बुधवार पेठेतील प्रभात टॉकीजच्या परिसरातील एका छोट्या घरात बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान अचानक सीलिंग फॅनचा स्फोट झाला. त्यांचा कंडेन्सर गरम होऊन हा स्फोट झाल्याचे प्रथम दर्शनी सांगितले जात आहे. स्वयंपाक सुरू असताना झालेल्या स्फोटामुळे घरातील लोक हडबडून गेले आणि शेगडीच्या जळांमुळे लोकांच्या कपड्याने पेड घेतला. या घटनेत मालन राजू भोसले, अनिता सुनील मोरे, किरण राजू बडेकर, संगिता सदाशिव भोसले, उमेश आंबा डुबळे, अमर सदाशिव भोसले हे भाजून जखमी झाले.
जखमींना तातडीने कॉटेज शमध्ये दाखल केले
अचानक कसला तरी स्पोर्ट होऊन घरातील लोक भाजल्यामुळे बुधवार पेठेतील नागरिक घटनास्थळाकडे धावले. भाजल्यामळे जखमी झालेल्या लोकांना त्यांनी कॉटेज रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार घेऊन सर्व जखमी कृष्णा रुग्णालय दाखल झाले.
स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल
बुधवार पेठेत कसलातरी स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना कळताच डी वाय एस पी चे रीडर अमित बाबर पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे शशिकांत काळे आणि इतर कर्मचारी, कराड नगरपालिकेचा अग्निशामक बंब आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी ची पाहणी केली. मात्र ही घटना गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झाली नसल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीमुळे निदर्शनास आले.