सातारा जिल्ह्यातील ‘ही’ 57 गावे होणार 100 टक्के सौरग्राम

0
1152
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प अधिवेशनात नुकताच सादर केला. तसेच सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी व टेकवडी या गावांना “सौरग्राम” म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेद्वारे १०० टक्‍के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यानुसार सौर ऊर्जाग्राम निर्मितीची व्याप्ती वाढविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील अधिकाधिक गावांचा सहभाग घेण्यात येणार आहे. याअंतर्गत गावे १०० टक्के सौरउर्जा ग्राम करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात अकरा तालुक्यातील ५७ गावांची निवड करण्यात आली आहे.

सौरउर्जा काळाची गरज झाली असून, आता सातारा जिल्हा परिषदही जिह्यात ‘मिशन शात ग्रामपंचायत’ उपक्रम राबवत आहे. त्यामधून अधिकाधिक गावे १०० टक्के सौरग्राम करण्यात येणार आहेत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करून हरित उर्जेच्या आधारे गाव उर्जा स्वयंपूर्ण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधी, माझी वसुंधरा अभियान आणि इतर योजनांच्या मामातून मिळालेल्या बक्षीस रक्कम, लोकवर्गणी, सीएसआर फंड अशा विविध निधीच्या मामातून गाव १०० टक्के सौरऊर्जा यंपूर्ण ग्राम कन शात विकासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.

आता सौर ऊर्जाग्राम निर्मितीची व्याप्ती वाढविण्यासाठी जिह्यातील अधिकाधिक गावांचा सहभाग घेण्यात येणार आहे. याअंतर्गत गावे १०० टक्के सौरउर्जा ग्राम करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात त्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच या गावांनीही स्वयंस्फुर्तीने सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे. पहिल्या टप्यात या गावांना शात उर्जेच्या आधारे उर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, जलजीवन मिशन, मागेल त्याला सौर कृषिपंप, पंधराव्या वित्त आयोगामार्फत मिळणारा निधी, लोकवर्गणी आणि सीएसआर फंडातून मिळणाया निधीचा उपयोग कन गावाची विजेची गरज गावातच राबवण्यासाठी ही मोहीम आहे.

11 तालुक्यातील 57 गावांचा समावेश

सातारा : कळंबे, आसगाव, धोंडेवाडी, ठोसेघर, फत्यापूर.
कोरेगाव : मुगाव, बर्गेवाडी, चवणेश्वर, बोबडेवाडी, बिचुकले.
खटाव : काळेवाडी, उंबरमळे, शिंदेवाडी, वरुड, विखळे.
माण : दिवड, चिलारवाडी, विरळी, पुकळेवाडी, रांजणी, वावरहिरे, कासारवाडी.
फलटण : धुमाळवाडी, सुरवडी, विठ्ठलवाडी, झिरपवाडी, वाठार (निंबाळकर), शिंदेवाडी, ढवळेवाडी (आसू).
खंडाळा : साळव, घाडगेवाडी, केसुर्डी.
वाई : दरेवाडी, वयगाव, वेळे, चांदवडी, मेणवली.
जावळी : चोरांबे, महामुलकरवाडी, म्हाते खुर्द, शिंदेवाडी, तळोशी.
महाबळेश्वर : क्षेत्र महाबळेश्वर, दाभेमोहन मेटगुताड, भोसे, झांजवड.
कराड : आदर्शनगर, पवारवाडी, पाचुंद, मुनावळे, बाबरमाची (डिचोली).
पाटण : ढोरोशी, सुरुल, आबदारवाडी, सुतारवाडी, बनपुरी, मंद्रुळकोळे.