फलटणला लाडकी बहिण योजनेचे 54 हजार 13 अर्ज मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलटण तालुक्यातील एकूण 58 हजार 149 अर्ज छाननी करून त्यापैकी 54 हजार 13 अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आले आहेत.

फलटण शहरासह तालुक्यातील सर्वसामान्य महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यापैकी ज्या महिलांचे वय 65 पूर्ण झाले आहे; अशा 10 महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर 4 हजार 126 महिलांचे अर्ज अपुऱ्या कागदपत्रांच्या अभावी तात्पुरत्या स्वरूपात नामंजूर करण्यात आले आहेत.

फलटण शहरासह तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननी करण्यासाठी फलटण तहसीलदार कार्यालय, सेतू केंद्र चालक, तलाठी व महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत फलटण नगरपरिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोलाची कामगिरी करत फक्त तीन दिवसात 58 हजार 149 अर्जांची छाननी करण्यात आली आहे.