सातारा प्रतिनिधी | दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी पोलीस दल अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारा शहरातील मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून सीआरपीएफ, आरसीपी व स्ट्रायकिंगच्या 28 तुकड्या सह सुमारे पाच हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
यासोबतच विविध शहरातील विसर्जन मिरवणुकींवर तब्बल ५ हजारहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांचा वॉच राहणार असून सातारा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.