सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावळ्यात पूर तसेच दरडी कोसळ्याचा धोका असतो. पूरप्रवण गावे नदीकाठची/ संभाव्य पूरप्रवण गावे १७२, तर संभाव्य दरडप्रवण गावे १२४ आहेत. या ठिकाणच्या आपत्ती रोखण्यासाठी तसेच आपत्ती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळूण-कराड महामार्ग सज्जनगड ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग, शेंद्रे ते बामणोली मार्ग आदी सहा प्रमुख मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका असतो. घाटनिहाय नोडल ऑफिसर नेमले असून, दरड कोसळल्यापासून आठ तासांत वाहतूक सुरळीत केली जाणार आहे.
पाटण तालुक्यातील दरडप्रवण 8 गावे
पाटण तालुक्यातील दरडप्रवण ८ गावे आहेत. आंबेघर खालचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), अंबेघर वरचे, काहीर या गावांचे एमएमआरडीएम मुंबई यांच्यामार्फत कायमस्वरुपी पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी ४९९ घरे बांधली आहे. देशातील हा एकमेव प्रकल्प असणार आहे.
तात्पुरते स्थलांतरणसाठी शेड उपलब्ध
२०२१ मध्ये पाटण तालुक्यामध्ये कोयनानगर येथील जलसंपदा विभागातील १५२ रुम, २०२० मध्ये पाटण तालुक्यातील जिमनवाडी- ७, सावरवाडी-२, म्हारखंड-७, बोरगेवाडी-१, कळंबे-१, भैरेवाडी (डेरवण)-१, बाटेवाडी-१, केंजळवाडी-२, मसुगडेवाडी- ४ व पाबळवाडी-१ येथे आणि जावली तालुक्यात घोटेघर रांजणी- ३, धनगरपेढा (मोरघर)- २, नरफदेव (मेरुलिंग)- २ येथे तसेच सातारा तालुक्यातील मोरेवाडी- २ व टोळेवाडी (मांडवे)-१२ निवारा शेड असे एकूण ४७ निवारा शेड बांधले आहेत.
एडीआरएफची दाखल होणार
संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीच्या कालावधीत एनडीआरएफची १ तुकडी १ जुलैला दाखल होणार असून, ती कराड, पाटणमध्ये पाठविली जाणार आहेत. दरडप्रवण व परप्रवण भागात प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यात ५०० आपदा मित्र आहे. दरडबाबतची निरिक्षणे व धोके याबाबत माहिती देण्यात आली. तशी दिसून आल्यास आपत्ती कक्षाशी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.