पाटण प्रतिनिधी | कोयना पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु असून, धरण निम्म्याने भरण्याच्या मार्गावर आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस कायम आहे. कोयनेचा जलसाठा साडेतीन टीएमसीने वाढून 50.76 टीएमसी तर 48.23 टक्के पाणीसाठा झाला आहे.
आज शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या नऊ तासांत कोयना धरणक्षेत्रात १६५ मिलीमीटर (साडेसहा इंच) एकूण २,२८८ मिलीमीटर (वार्षिक सरासरीच्या ४५.७६ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर, कुंभी धरणक्षेत्रात ३० मिलीमीटर, कास १७, कडवी ७०, दुधगंगा ६१, वारणा २९, तारळी १५ धोम- बलकवडी ८, उरमोडी धरण परिसरात ५ तर ठोसेघर धबधबा २५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. अन्यत्र, गजापुरला ९५ मिलीमीटर, सावर्डे ६३, निवळे ५१, जांभूर ४८, जोर ४७, वाकी ५०, वाळवण ४८, पाथपूंज ४३, दाजीपुर ४२, पाडळी ६०, रेवाचीवाडी येथे ३३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी 14.7 मि.मी. पाऊस
सातारा जिल्ह्यात दि. 18 जुलै रोजी सरासरी 14.7 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 422.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 13.3 (371.1), जावली-मेढा – 30.2 (641.1), पाटण – 26.4 (616.8), कराड –11.7 (393.1), कोरेगाव –6.5 (332.4), खटाव – वडूज – 6.7 (301.9), माण – दहिवडी – 2.0 (249.4), फलटण – 0.7 (277.5), खंडाळा – 3.4 (174.6), वाई – 11.0 (334.6), महाबळेश्वर – 78.3 (1321.1) या प्रमाणे पाऊस झाला आहे.
Koyna Dam
Date: 20/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2108’01” (642.544m)
Dam Storage:
Gross: 50.76 TMC (48.23%)
Live: 45.64 TMC (45.58%)
Inflow : 42,991 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm -(Daily/Cumulative)
Koyna- 85/2286
Navaja- 100/2720
Mahabaleshwar- 95/2101