सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे भरधाव वेगातील एका ट्रकने दोन मालट्रकसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र अपघातात सहा वाहने व हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 रोजी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दिशेस भरधाव वेगाने ट्रक क्रमांक (MH-9-CU-5454) निघाला होता. यावेळी या ट्रकने जोरदार धाडलं दिली. या धडकेमुळे इतर दोन ट्रक व तीन वाहनांचा देखील विचित्र अपघात झाला. अपघातानंतर ट्रक महामार्गावरील दुभाजक ओलांडून पलीकडील बाजूस असलेल्या एका हॉटेलला जाऊन धडकला.
या सर्व घटनेमध्ये टेम्पो क्रमांक (MH-11 AL-3301), टाटा पिकअप (MH-23 AU-4097), मालट्रक (KA-22-B-2870), मारुती वाहन (एम.एच.-9 एफ.बी.-2148), चारचाकी वाहन (MH-20 -FU-9450) या वाहनांचे व हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या अपघातप्रकरणी मालट्रक चालक संदीप संपत यादव (वय 28, रा. भिलवडी, ता.पलूस, जि. सांगली) याच्या विरोधात अरुण मारुती सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहेत.