कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असलीतरी सोमवारपासून उघडीप दिली आहे. सध्या रिमझिम पाऊस सुरु असून बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोयनानगर येथे फक्त 11 तर नवजा 19 आणि महाबळेश्वरला 35 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणातील आवकही कमी झाली असलीतरी पाणीसाठा 43.09 टीएमसीवर पोहोचलाय. जिल्ह्यात पावसाची सुरु असलेली उघडझाप ही चिंता वाढवत आहे.

शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. कास, बामणोली, तापोळा, बामणोलीसह कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झाेडपले. सातारा शहरातही जोरदार पाऊस पडला. तसेच वाई, कराड, जावळी तालुक्यातही पाऊस बरसला. पण, सोमवारपासून पाऊस कमी झाला आहे. त्यातच सूर्यदर्शनही घडत आहे. मंगळवारीही जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम होती. अपवादात्मक स्थितीत पाऊस होत आहे. बुजवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.

कोयनानगर येथे 11 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत 2 हजार 1 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. नवजा येथे आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला. दीड महिन्यात 2 हजार 338 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत 1 हजार 804 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आवकही कमी झाली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास सुमारे 11 हजार 844 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 43.09 टीएमसी झालेला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. तर सातारा शहरात ढगाळ वातावरण राहत आहे. काहीवेळा सूर्यदर्शनही घडत आहे.

Koyna Dam

Date: 17/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2099’00” (639.775m)

Dam Storage:
Gross: 43.09 TMC (40.94%)
Live: 37.97 TMC (37.92%)

Inflow : 11,844 Cusecs.

Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 11/2001
Navaja- 19/2338
Mahabaleshwar- 35/1804