पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर दिवसभरात रविवारी आणि सोमवारी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस रविवारी दिवसभर पडला. सोमवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात काहीशी पावसाने विश्रांती दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 42.06 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 39.96 टक्के भरले आहे. तर धरणात 18 हजार 950 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत नवजा येथे 20 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 08 आणि महाबळेश्वरला 17 मिलीमीटरची नोंद झाली होती. बारा तासांत नवजा, कोयनामध्ये कमी पर्जन्यमान झाले असून सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. परिणामी कोयना धरणाचा पाणीसाठा 42.06 टीएमसी झाला आहे.
सातारा जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 1 हजार 990 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 319 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 769 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
Koyna Dam
Date: 16/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2097’04” (639.267m)
Dam Storage:
Gross: 42.06 TMC (39.96%)
Live: 36.94 TMC (36.89%)
Inflow : 18,950 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 08/1990
Navaja- 20/2319
Mahabaleshwar- 17/1769