कोयना धरणातून दुपारी ‘इतका’ विसर्ग वाढणार, कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणात आज मंगळवारी सकाळी ८ वाजता एकूण ८५.३७ टीएमसी (८१.११%) पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून ३०,००० क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी १२:०० वा. सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच पाण्याची आवक पाहून विसर्गात वाढ करण्यात येईल.

धरणाचा सांडव्यावरून ४०,००० आणि पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक्स होईल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Koyna Dam

Date: 30/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2147’02” (654.456m)

Dam Storage:
Gross: 85.37 TMC (81.11%)
Live: 80.25 TMC (80.14%)

Inflow : 35,401 Cusecs.

Discharges
Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 107/3583
Navaja- 99/4154
Mahabaleshwar- 158/3913