पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून दिवसभरात मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाळा सुरुवात झाल्यानंतर रविवारी दुपारी काहीशी विश्रांती दिली. रविवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली आहे. सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 38.28 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 36.37 टक्के भरले आहे. तर धरणात सहा तासांत 64 हजार 58 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक झाली आहे. तर नवजाला 185 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी सकाळपर्यंत नवजा येथे 162 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 147 आणि महाबळेश्वरला 138 मिलीमीटरची नोंद झाली होती. चोवीस तासात नवजा, कोयना, महाबळेश्वरमध्ये चांगले पर्जन्यमान झाले असून सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 122 तर नवजाला 185 आणि महाबळेश्वरमध्ये 52 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा 38.28 टीएमसी झाला आहे.
सातारा जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 1 हजार 917 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 210 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 705 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारापर्यंत चोवीस तासात 38 हजार 82 तर सहा तासांत 64 हजार 58 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
Koyna Dam
Date: 14/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2091’02” (637.388m)
Dam Storage:
Gross: 38.28 TMC (36.37%)
Live: 33.16 TMC (33.11%)
Inflow (24 hr) : 38,082 Cusecs.
Inflow (06 hr) : 64,058 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 122/1917
Navaja- 185/2210
Mahabaleshwar- 52/1705