पाटण प्रतिनिधी । आज हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पाटण तालुक्यात देखील पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपर्यंत नवजा येथे 162 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 147 आणि महाबळेश्वरला 138 मिलीमीटरची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा वाढू लागला असून सध्या धरणात 36.23 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत कोयनेत 1 हजार 795 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 25 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 653 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 18 हजार 757 क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे.
पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. उर्वरित जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून या याठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Koyna Dam
Date: 14/07/2024
Time: 08:00 AM
Water Level: 2087”08” (636.321m)
Dam Storage:
Gross: 36.23 TMC (34.42%)
Live: 31.11 TMC (31.07%)
Inflow : 18 thousand 757 cusecs
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 147/1795
Navja- 162/2025
Mahabaleshwar- 138/1653