पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात शुक्रवारी काहीशा प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली असून शनिवारी सकाळपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा 34.60 टीएमसीवर पोहोचला होता. दिवसभरात धरणातीळ पाणीसाठ्यात वाढ झाली असून सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 34.99 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 33.24 टक्के भरले आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 49 तर नवजाला 49 आणि महाबळेश्वरमध्ये 32 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. शनिवारी रिमझिम पडलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाणीसाठा 34.99 टीएमसी झाला आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 1 हजार 697 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 1 हजार 912 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 547 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारापर्यंत 13 हजार 240 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
Koyna Dam
Date: 13/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2085’06” (635.660m)
Dam Storage:
Gross: 34.99 TMC (33.24%)
Live: 29.87 TMC (29.83%)
Inflow : 13,240 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 49/1697
Navaja- 49/1912
Mahabaleshwar- 32/1547