सातारा प्रतिनिधी । सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात तलवारीने वार करून एकाला जखमी केल्याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तनुजा यांचे पती दत्तात्रय पवार हे शाहूपुरी चौकातून मोळाचा ओढा परिसराच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. या वेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने त्यांच्या मांडीवर तलवारीने वार केला, तसेच पुन्हा पाठीमागून येऊन एक वार केला.
तो दत्तात्रय यांनी उजव्या हाताने अडविला. त्यामुळे त्यांच्या हाताला जखम झाली. त्यानंतर दत्तात्रय यांना दुचाकीवरून ढकलून देऊन संशयित पसार झाले, असे तनुजा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत तनुजा दत्तात्रय पवार (रा.जयहिंद कॉलनीजवळ, शाहूपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार बोराटे तपास करत आहेत.