कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात रात्रीच्यावेळी अगोदरच चोरट्यांकडून धुमाकूळ घेतला जात असताना आता तालुक्यात तब्बल 3 बिबटे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ठीक 1 वाजून 34 मिनिटांनी रस्त्यावरून जात असलेली या बिबट्यांची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती की, कराड तालुक्यातील वराडे गाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये केली जात होती. मात्र, मंगळवारी रात्री ठीक 1 वाजून 34 मिनिटांनी गावातील एक इमारतीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शांत रस्त्यांवरून तीन बिबटे जात असल्याची दृश्ये कैद झाली आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कराड तालुक्यात पुन्हा 3 बिबट्यांची दहशत ; रात्रीस ‘या’ गावात बिबट्याचा वावर pic.twitter.com/lnrBtGLLwd
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 26, 2023
वराडे गावच्या शेत शिवारात फिरत असलेल्या बिबटयांनी अन्न मिळवण्याच्या शोधात आता मानवी वस्तीत प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी सायंकाळनंतर घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.