कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील वराडे गावात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबटे सीसीटिव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले होते. त्यानंतर आज शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेले 3 बिबटे गावात फिरत असल्याचे पुन्हा CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे, ता. कराड येथील गावात मागील पंधरा दिवसांपुर्वी आनंदराव जाधव यांच्या घरासमोर बांधलेले पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले होते. त्यानंतर MIDC तील दोन वासरे व एक कुत्रे फस्त केले. या बिबट्यांचा अनेक महिन्यांपासून डोंगर परिसरात वावर असल्याने आता तर बिबटे लोक वस्तीत वावरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा बिबटे गावात शिरले.
वराडेत 3 बिबट्यांचे पुन्हा दर्शन; CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/CqO5eNsEs8
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 18, 2023
त्यांचा गावात वावरत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ग्रामस्थांच्या पाचावर धारण बसली आहे. लहान मुले व जनावरे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान गावकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडे येथे आहे. मात्र, त्याकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत.