सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्हयामध्ये झालेले ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सराईत दोन चोरट्यास आज अटक केली. त्यांच्याकडून २५.५ तोळे वजनाचे सुमारे १८ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
१) रमेश महादेव कुंभार रा. ठाणे २) निलेश शामराव गाढवे (रा. बनवडी ता. कोरेगांव जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरओपीची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी सातारा जिल्हयामध्ये घडलेले घरफोडीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना श्री अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याकरीता सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष तपास पथक तयार केले असून त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
श्री अरुण देवकर यांना पोलीस अभिलेखावरील आरोपींनी सातारा जिल्हयामध्ये घरफोडीचे गुन्हे केले असल्याची माहिती प्राप्त झाली होती, त्याप्रमाणे यापुर्वी पोलीस अभिलेखावरील १) रमेश महादेव कुंभार (रा. ठाणे) २) निलेश शामराव गाढवे (रा. बनवडी ता. कोरेगांव जि. सातारा) यांना अटक केले. त्यांच्याकडून ३ घरफोडीच्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ५२ तोळे वजनाचे चालू बाजारभावाप्रमाणे ३६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सातारा पोलिसांकडून 18 लाख 36 हजार रुपये किंमतीचे 25.5 तोळे वजनाचे दागिने चोरट्याकडून जप्त pic.twitter.com/oJ5B5XPn1n
— santosh gurav (@santosh29590931) June 18, 2024
सदर आरोपी यांचा साथीदार रफिक महमुद उर्फ मेहबूब शेख (रा. पहिली राबोडी जुम्मा मशिदीचे मागे बापूजीनगर राबोडी ठाणे) हा परागंदा होता. सदर आरोपी यास फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं १५९२/२०२३ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०,३४ या गुन्हयामध्ये अटक करुन त्याच्याकडे कौशल्याने तपास करुन त्याने सातारा जिल्हयामध्ये ३ घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न करुन त्याच्याकडून २५.५ तोळे वजनाचे, चालू बाजारभावाप्रमाणे १८ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करुन सातारा जिल्हयातील ३ घरफोडीचे गुन्हे उघड केले आहेत.
२८५ गुन्हे उघड; ४ कोटी ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे एकुण २८५ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ६३७.५ तोळे (६ किलो ३७५ ग्रॅम) वजनाचे ४,४५,२०,९००/- (चार कोटी पंच्चेचाळीस लाख वीस हजार नऊशे रुपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षकांनी केले अभिनंदन
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर , सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, अमोल माने, जयवंत खांडके, हसन तडवी, अजित कर्णे, अरुण पाटील, अमित माने, मनोज जाधव, प्रविण कांबळे, राजु कांबळे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, धीरज महाडीक, सचिन ससाणे, प्रविण पवार, वैभव सावंत, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, श्रीमती आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.