‘लाडक्या बहिणीं’ना आणखी एक गिफ्ट! सातारा जिल्ह्यातील 26 हजार महिलांना मिळणार एक मोफत साडी

0
1500
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्यातील महायुती सरकारच्या वतीने नववर्षात शाइतकरी, महिला आणि नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यापैकी ‘लाडक्या बहिणीं’ना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार आहे. शासनाकडून आता महिलांना रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते. यंदाही लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे लवकरच वितरण केले जाणार आहे. याप्रमाणे सातारा जिल्ह्यात २६ हजार ८३४ महिलांना याचा लाभ देण्याच्या अनुषंगाने नियोजन केले आहे.

सातारा जिल्ह्यात २६ हजार ८३४ अंतोदय योजनेच्या शिधापत्रिकी महिला लाभार्थींची संख्या आहे. जिल्ह्यातील काही दिवसात सर्व तालुक्यांत साड्या पोहोचल्यानंतर वाटप सुरू होणार आहे. योजनेची नोडल संस्था असणाऱ्या राज्य यंत्रमाग महामंडळाकडून साड्यांचे गड्ढे प्रथम तालुका गोदामापर्यंत आणले जातील. तेथून अंत्योदयच्या कुटुंबापर्यंत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे तहसीलदार व गोदामपाल व संबंधित पुरवठा विभाग यांची राहणार आहे.

होळीपर्यंत होणार वाटप

रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणाऱ्या साड्यांच्या गठ्यांची नोंद ऑनलाइन पद्धतीनेच ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच योजनेअंतर्गत साडयांचे वितरण प्रजासत्ताक दिन ते होळी (दि.१३ मार्च) या सणांदरम्यान करण्याचे निश्चित केले आहे.

26 हजार महिलांना मिळणार साडी

या साड्यांचे वाटप ई-पॉस मशीनद्वारे करण्यात येणार असून, महामंडळाकडून तालुकास्तरावरील गोदामापर्यंत ज्या प्रमाणात साड्यांचा पुरवठा करण्यात येईल, त्याप्रमाणात तत्काळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपर्यंत साड्यांचे वाटप करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात २६ हजार ८३४ साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 3 लाख कुटुंबांना मिळते रेशन

सातारा तालुक्यात सध्या ‘अंत्योदय’चे २७ हजार ७ आणि प्राधान्य गटाचे ३ लाख ६२ हजार ०४२, असे ३ लाख ८८ हजार ९०७ गार लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील १ हजार ७१२ रेशन दुकानदारांमार्फत त्यांना धान्य वितरित करण्यात येते.

कोणत्या तालुक्यात किती रेशनकार्डधारक

१) कराड : २८७, २) सातारा : २२४, ३)खंडाळा : ८३, ४)वाई : १०९, ५) फलटण : १८०, ६) माण : १३९, ७) जावली : ९५, ८) पाटण : २५५, ९) खटाव : १५९, १०) महाबळेश्वर : ४७

कोणत्या तालुक्यात किती महिलांना मिळणार?

सातारा : २०६४
कोरेगाव : २२३७
कराड : ६०९६
खटाव : १९५७
पाटण : २८५७
माण : २८७२
फलटण : ३७४६
खंडाळा : ९८०
वाई : १५६५
महाबळेश्वर : ५६१
जावली : १७९९
एकूण तालुका : अंत्योदय कार्डधारक २६८३४

लवकरच साठी वाटपाबाबत निर्णय

सातारा अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांमधील महिलांना एक साडी भेट दिली जाते. यंदाही साड्यांचे वाटप केले जाणार असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात साडीचे वितरण केले जाणार आहे. त्याबाबत नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या वतीने ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना देण्यात आली.