कोयना धरणातून आज पुढील 1 तासात होणार 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग

0
5

पाटण प्रतिनिधी | सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून शुक्रवार दि. ३ रोजी दुपारी १२ वाजता पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, कोयना नदीपात्रात संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याने ४ रोजी दुपारी १२ वाजता विद्युतगृहाचे दुसरे युनिट सुरू करून कोयना नदीपात्रात एकूण २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट आधीपासूनच सुरू आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी आणखी वाढल्याने शुक्रवार ३ रोजी दुपारी १२ वाजता कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार होते. मात्र कोयना नदीपात्रात संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू असल्याने ३ रोजी दुपारी १२ वाजता सुरू करण्यात येणारे कोयना धरणाचे दुसरे युनिट आता ४ रोजी दुपारी १२ वाजता सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत

कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. दुसरे युनिट सुरू केल्यानंतर नदीपात्रात एकूण २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जाणार आहे. नदीकाठाच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, अशी माहिती कोयना घरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.