सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, ता. वाई येथे रविवारी सकाळी इनोव्हा कारची नादुरुस्त कंटनेरला जोराची धडक झाली. या भीषण अपघातात सातारा व सांगली येथील दोन महिला जागीच ठार झाल्या, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातार्याकडून पुण्याकडे निघालेल्या इनोव्हा कार (एमएच-11-बीके-1567) ने महामार्गावर नादुरुस्त झालेल्या कंटेनर (एमएच-14-जेएल-2473) ला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील जहिरा समीर शेख (वय 38, रा. शनिवार पेठ, सातारा) आणि सलमा इरफान मोमीन (वय 41, रा. सांगली) या गंभीर जखमी झाल्या.
त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.