वाघजाईवाडीत भिंत खचून 2 जनावरे मृत्युमुखी; पाटण प्रशासनाचा तात्काळ मदतीचा हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतराजीत धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस मुसळधार सुरू असल्याने कोयना धरणात आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, पाटण तालुक्यात कुठे अंगणवाडीची तर कुठे घराच्या इमारतिची पडझड होत असल्याच्या घटना घडत आहेत. पाटण तालुक्यातील वाघजाईवाडी येथील गणपत खाशाबा पवार यांच्या जनावरांच्या शेडची भिंत पावसामुळे खचून झालेल्या दुर्घटनेत एक म्हैस आणि रेडकाचा मृत्यू झाला.

पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे मातीच्या घरांची भीत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. वाघजाईवाडी तेथील एक शेतकऱ्याच्या जनावरांच्या शेडची भीत कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटना घडलेल्या ठिकाणी प्रशासनाने त्वरित मदत पाठवून पडलेल्या भिंतीचा मलबा जेसीबीने हटवला. तसेच जनावरांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावली. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही त्वरित करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी सुनील गाडे व तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले.

तलावात पोहत जाऊन विद्युत तारा ओढून वीज पुरवठा सुरळीत

तर उसरीकडे पाटण तालुक्यातील रासाटी शाखेअंतर्गत येणाऱ्या देकघर येथे अतिवृष्टीमुळे विजेचे पोल पडल्यामुळे दुर्गम भागातील गोकारे, तलोशी, काघणे, नाक, चिरंबे अशी 5 गावे अंधारात गेली होती. ही बाब स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी पाटण यांच्या निदर्शनास आणून दिली. वीज वितरण विभागाचे उपअभियंता कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता मंगेश क्षीरसागर, वायरमन आकाश कुंभार, अमित सपकाळ यांनी तत्काळ पाऊस सुरू असताना देखील तलावात पोहत जाऊन विद्युत तारा ओढून वीज पुरवठा सुरळीत केला.

घराची भिंत कोसळली

पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात दोन-तीन दिवसांपासून पाकसाची संततधार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत काढ झाली आहे. काही ठिकाणी पुलाकरून पाणी जात आहे, तर काही ठिकाणी रस्त्याकर झाडे पडल्याच्यादेखील घटना घडत आहेत. संततधार पावसामुळे कारळे येथील कोंडिबा बंडू साळुंखे यांच्या घराची भिंत पाकसामुळे पडली. अशा संकटांच्या अनुषंगाने पाटण प्रशासन रात्रंदिकस अलर्ट असून, तत्काळ उपाययोजनादेखील करण्यात येत आहेत.