सातारा प्रतिनिधी | राज्यात खरीपामध्ये पाऊस लांबल्याने महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका देखील पार पडल्या. मात्र, विमा कंपन्यांकडून कारणे सांगून टाळाटाळ केली जात होती. अखेर सातारा जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे विमा कंपन्यांना ६३ मंडलातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे दिवाळीतच शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच कोटी जमा झाले.
शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके तसेच फळबागांसाठीही ही योजना आहे. यावर्षीच्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या पावणे तीन लाखांच्या घरात आहे. पण, खरीप हंगामात २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने राज्यातील शेकडो मंडले नुकसान भरपाईसाठी पात्र ठरली.
सातारा जिल्ह्यातील अशा मंडलची संख्या ६३ आहे. यामध्ये कराड तालुक्यातील सर्वाधिक १३ मंडले आहेत. यानंतर खटाव तालुक्यातील ९, कोरेगाव ८, फलटण ७, सातारा तालुका ६, वाई, पाटण आणि माण तालुक्यातील प्रत्येकी ५, खंडाळ्यातील ३ आणि जावळीतील २ मंडलांचा समावेश आहे. यामधील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरले आहेत.
शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हॅलो कृषी हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि सरकारी योजनांचा फायदा घ्या. याव्यतिरिक्त Hello Krushi वर तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी याबाबतची संपूर्ण माहिती अगदी मोफत मध्ये मिळते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करून मोबाईल मध्ये Install करा. आणि वेगवेगळ्या कृषी योजनांचा आणि सरकारी अनुदानाचा लाभ घ्या.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here
साताऱ्यात ‘इतक्या’ लाख अर्जधारकांना मिळाला फायदा…
सातारा जिल्ह्यातील ६३ महसूल मंडलात सलग २१ दिवस किंवा त्याहून अधिक पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळणार आहे. सुमारे १ लाख ७३ हजार एवढी विमा घेतलेल्या अर्जधारकांची संख्या आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, खरीप
कांदा या ९ पिकांसाठी विमा योजना होती.