सातारा प्रतिनिधी । सातारा शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहरातील कन्या शाळेमध्ये दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलीचा खेळताना पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कन्या शाळा यादोगोपाळ पेठ या ठिकाणी राहत असलेली ही विद्यार्थीनीचे नाव अक्षदा देशमुख असे असून ती 15 वर्षाची होती. साताऱ्यातील कन्या शाळा या नावाने प्रसिद्ध असलेल्या शाळेच्या वेळेत कबड्डीचा सराव करत असताना ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील कन्या शाळेत शिक्षण घेत असलेली अक्षदा देशमुख ही कबड्डीची खेळाडू आहे. ती दररोज शाळेत कबड्डीच सराव करत होती. परंतु बुधवारी सायंकाळी ही शाळेत कबड्डीचा सराव करत होती. अक्षदा खेळतानाचा डोक्यावर जोरात आपटली. डोक्यावर पडल्याने तिच्या नकातून रक्त येऊ लागला. हे पाहून इतर विद्यार्थीनीनी तिला धीर देत बाजुला बसवले. डोक्याला मार लागल्याने तिला चक्कर येऊ लागली पुढील काही वेळात ती बेशुद्ध झाली. विद्यार्थीनीनी ही बाब शिक्षकांना सांगितली.
त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. तसेच या घटनेची माहिती तिच्या मामा व मामी, काका व काकी, नातेवाईकांना देण्यात आली. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अक्षताच्या आई-वडिलांचे निधन झाले असून मामा तिचा सांभाळ करत होते. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.