साखर उताऱ्यात सातारा जिल्हयातील ‘हे’ 15 सहकारी कारखाने आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत तब्बल ५९ लाख ९९ हजार टन उसाचे गाळप करून ५८ लाख ५० हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. यावर्षी गाळपाचा वेग वाढला असला तरी सरासरी उताऱ्यावर परिणाम झाला असून, सरासरी ९.७५ टक्केच उतारा पडत आहे.
तर खासगी कारखाने यावर्षी साखर उताऱ्यात मागे पडल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन वर्षांच्या ऊस गाळपाचा आढावा पाहिल्यास खासगी कारखाने मोठ्या प्रमाणात गाळप करून उताराही चांगला मिळत होता; पण यावर्षी खासगी कारखान्यांना कमी प्रमाणात उतारा मिळू लागला आहे. सातपैकी ग्रीन पॉवर शुगर आणि खटाव माण ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला अकरा टक्के साखर उतारा मिळाला आहे. उर्वरित पाच कारखाने हे दहा ते सात टक्क्यांपर्यंत उतारा मिळाला आहे.

यावर्षी नोव्हेंबरमध्ये कारखाने सुरू झाले आहेत. आतपर्यंत अडीच महिन्यांत कारखान्यांनी निम्म्यापेक्षा जास्त ऊस तोडला आहे. सहकारी आठ कारखान्यांनी आतापर्यंत ३० लाख ७३ हजार २४२ टन उसाचे गाळप करत ३३ लाख २६ हजार ७८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी १०.८२ टक्के साखर उतारा मिळाल्याचे अहवालावरून दिसत आहे, तर खासगी सात कारखान्यांनी आतापर्यंत २९ लाख २६ हजार ३०० टन उसाचे गाळप करत २५ लाख २३ हजार ५२६ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी ८.६ टक्के उतारा पडला आहे.