कराड प्रतिनिधी | ऊस पिकाला आग लागून सुमारे १५ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे मंगळवारी घडली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारायणवाडी असलेल्या गावानंद शिवार परिसरात ऊस पीक मोठ्या प्रमाणात आहे. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिवारातील ऊस पिकाला आग लागल्याचे काही शेतकर्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वार्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे या आगीत शिवारातील सुमारे १५ एकर ऊस जवळून खाक झाला. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, नकी ही आग कशामुळे लागली, हे स्पष्ट झालेले नाही. परंतु, विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागली असल्याची चर्चा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये होती. या घटनेत शेतकर्यांच्या नुकसानाची माहिती घेवून झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.