पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु आहे. गत चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे धरणात 15.17 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काल पाणलोट क्षेत्रांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरण्या केल्या जात आहेत.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर आहे. गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे 26 मिलीमीटर आणि कोयनानगर येथे 10 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीपातळी 2042 फूट झाली आहे.
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात बी १४.४१ टक्के पाणीसाठा झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. त्यातच शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार आहे.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –
Koyna Dam
Date : 13/06/2024
Time : 08:00 AM
Water level : 2042”10” (622.656m)
Dam Storage :
Gross : 15.17 TMC (14.41%)
Live : 10.05 TMC (10.03%)
Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna – 10/181
Navaja – 26/228
Mahabaleshwar – 12/183