कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकानातून स्वस्त धन्याचा पुरवठा केला जातो. शासनाच्यावतीने पुरवठा करल्या जाणाऱ्या रास्त भाव दुकानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 131 नव्याने रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांना मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आज दि. 1 जुलै 2023 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला असून रास्त भाव दुकाने चालविण्याकरिता इच्छुक असलेल्यांनी संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी राजमाने म्हणाल्या, जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकाने मंजुर करण्याच्या अनुषंगाने आज दि.1 जुलै 2023 रोजीपासून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये, सातारा तालुका – ग्रामीण भागातील गावे- 13 व शहरी भागातील 03, वाई तालुका- ग्रामीण भागातील गावे -१६ व शहरी भागातील 01 तसेच कराड तालुका ग्रामीण भागातील गावे – 01 व शहरी भाग – 04 याशिवाय, ग्रामीण भागाकरीता माण तालुका 04, महाबळेश्वर तालुका-45, खंडाळा तालुका -09, कोरेगाव तालुका -14, खटाव तालुका-07, फलटण तालुका – 05, पाटण तालुका-09 अशा एकूण – 131 गावे / ठिकाणांचा समावेश आहे.
याकरीता संबंधित तालुक्यांचे तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करणेचा कालावधी दि. 1 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 अखेर (सुट्टीचे दिवस सोडून) असा निश्चित करण्यात आला आहे. तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्य क्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरिता ज्यांना अर्ज करणार असतील तर त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजमाने यांनी दिली.