सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन अधिकारी आणि ९ कर्मचाऱ्यांना २०२३ वर्षासाठी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाचा गाैरव वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे व सध्या सोलापूर जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक विश्वजीत घोडके यांनाही हे सन्मानचिन्ह मिळाले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. राज्यातील ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले आहे.
यामध्ये सातारा जिल्हा पोलिस दलातील ११ जणांचा समावेश आहे तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे व सध्या सोलापूर जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक विश्वजीत घोडके यांनाही हे सन्मानचिन्ह मिळाले आहे. तर संजय टिळेकर, कमलाकर कुंभार, भरत शिंदे, श्रीधर ठोंबरे आणि नंदकुमार महाडिक या सहायक पोलिस उपिनरीक्षकांनाही हा सन्मान जाहीर झालेला आहे. हवालदार महादेव घाडगे, विनोद राजे आणि पोलिस शिपाई बिपीन ढवळे व मंगेश जाधव यांनाही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे. यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाचा गाैरव वाढला आहे.