कोयना धरणाच्या पायथा वीजघरातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
466
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून आज शुक्रवारी दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने कमी हजेरी लावली. दरम्यान, कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 33.56 TMC इतका पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून आठवडाभरात धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. दरम्यान, धारण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात 32.51 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातून आज कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्यामुळे नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीपात्रातील पाणीपातळी वाढू लागली असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव कृष्णा- कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून माण, खढ़ाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी मागील आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच ओढे खळाळून वाहत आहेत. दरम्यान, पश्चिम भागातही पाऊस पडत असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोयनानगर येथे 39, नवजाला 74 तर महाबळेश्वर यथे 68 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Koyna Dam
Date: 20/06/2025, 5:00 PM
Water level: 2083’00”
(634.898m)

Gross Storage: 33.56 TMC (31.89%)

Inflow : 40,503 Cusecs.
(3.49 TMC)

Discharges
KDPH: 1050 Cusecs

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 39/726
Navaja- 74/790
Mahabaleshwar- 68/721