पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. सकाळी आठ वाजता २४ तासांत कोयनाला १६४ तर नवजा येथे १४५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून त्यातून १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस झालयामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १६३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरला १४० मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत कोयनेला २ हजार ७३२ आणि नवजा येथे ३ हजार २२८ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात सुमारे 47 हजार 693 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ६४.५५ टीएमसी पाणीसाठा झालेला. २४ तासांत धरणात चार टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे. त्यातच कोयना धरण व्यवस्थापनाने पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजता पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १ हजार ५० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कोयना नदीत जात असल्यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
Koyna Dam
Date: 23/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2123’09” (647.319m)
Dam Storage:
Gross: 64.55 TMC (61.33%)
Live: 59.43 TMC (59.35%)
Inflow : 47,693 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 163/2732
Navaja- 145/3228
Mahabaleshwar- 140/2644