पाटण प्रतिनिधी । पावसाळ्यात विशेषतः अतिवृष्टी काळात विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी शालेय इमारत उपलब्ध होणे सु अत्यावश्यक असते. याबाबी लक्षात विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पाटण तालुक्यातील अतिवृष्टी, भूस्खलन, दरडप्रवण व पूररेषा बाधित क्षेत्रातील १०४ शाळा दि. १ जूनपासून सुरू कराव्यात. या शाळांना जुलै व ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी काळात सुटी देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नुकतेच पाटण पंचायत समितीला दिले.
पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळांना अतिवृष्टी काळात सुट्टी देण्याचे आदेश दिलयामुळे तालुक्यातील १०४ शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचा निर्णय प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर घ्यावयाचे आहेत. सुट्टीमधील शालेय शैक्षणिक कामकाज याच शैक्षणिक वर्षातील सुटीच्या काळात शाळा भरवून पूर्ण करावे, असे म्हटले आहे, तर शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्यांचा कालावधी एकूण ग ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची न, दक्षता घ्यावी, असेही सीईओ यांनीदिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
‘या’ १०४ शाळांना मिळणार सुट्टी
पाटण तालुक्यातील धनावडेवाडी, सातर, ताईडेवाडी, हौदाचीवाडी, कोळेकरवाडी, आंबेघर तर्फ मरळी, दिक्षी, गुरेघर, धावडे, काहीर, वरपेवाडी, आंबेघर, कुसवडे (देवघर), कोंडावळे, चाफ्याचा खडक, दावीचावाडा, नेचल, किसरुळे, ढाणकल, घाटमाथा (कुसवडे), गोवारे, पाथरपुंज, कोळणे, मळे, नाव, बोपोली, हेळवाक, जांभूळवन, मरडवाडी, रामेल, जवरातवाडी, घाणवी, नरसोबाचीवाडी, फणसवाडी, खुड्डुपलेवाडी, जोगेटेक, धुईलवाडी, गावडेवाडी, कारवट, वाटोळे, चिरंबे (हेळवाक), वाघणे, देवघर (कु), मिरगाव, कामरगाव, मानाईनगर, शिरशिंगे, नवजा, झाडोली, हुंबरळी, डिचोली, पुनवली, आंबेघर, सडादुसाळे, सडावाघापूर, रासाटी, दास्तान, देशमुखवाडी, ऐनाचीवाडी, पायट्यावाडा, गोषटवाडी, काठी, काठीटेक, बाजे, पांढरेपाणी, कराटे, वांझोळे, डोणीचावाडा, मिरासवाडी, विठ्ठलवाडी, गुणुकलेवाडी, आटोली, पाचगणी, जोतिबाचीवाडी, रोमणवाडी, घेरादातेगड, खंडुचावाडा, मारुल तर्फ पाटण, शिरळ, धनगरवाडी, बाहे, हुंबरणे, तोरणे, शिवंदेश्वर, गोकुळ तर्फ हेळगाव, करंजवडे, गोकुळबी, आंबेघर, गाडखोप, नाणेल, बाजे वरचे, लोहारवाडी, धनगरवाडा, भरेवाडी, डाकेवाडी, अवसरी, भारसाखळे, करपेवाडी, सडादाढोली, सडानिनाई आणि सडाबोडकेवाडी या प्राथमिक शाळांचा सुट्टीच्या आदेशात समावेश आहे.