पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात काल रविवारी पावसाने चांगली हजेरी लावली. सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा असून धरण 97.63 टक्के भरलं आहे.
कराड तालुक्यातील काही भागात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सात वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली असून रात्रीपासून सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 12 मिलीमीटर, नवजा येथे 13 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
तारा जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. विशेष करून जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात दाणादाण उडाली होती. लोकांना न घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. जवळपास १२ दिवस धो-धो पाऊस पडत होता. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढला. त्यामुळेच जुलै महिना संपताना या प्रमुख धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला होता.
तसेच ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतरही काही दिवस पावसाचे प्रमाण चांगले राहिले. पण, जोर कमी झाला होता. तरीही धरणांत पाण्याची आवक सुरू होती. परिणामी सर्वच धरणांत १२९ टीएमसीवर पाणीसाठा निर्माण झाला आहे. मात्र, पाच ऑगस्टनंतर पाऊस कमी होत गेला. तसेच त्यानंतर काहीदिवस उघडीप राहिली. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले. पण, कालपासून पश्चिम भागातही पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
Koyna Dam
Date: 23/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2161’07” (658.851m)
Dam Storage :
Gross: 102.76 TMC (97.63%)
Live: 97.64 TMC (97.51%)
Inflow : 00 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 12/5347
Navaja- 13/6537
Mahabaleshwar- 03/6200