कराड प्रतिनिधी | कराड शहरानजीक असलेल्या गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात काही शेतकऱ्यांनी ऊसाचा खोडवा पेटवला. यामुळे खोडव्याची आग परिसरात पसरून यामध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त एकर ऊसाचे क्षेत्र जळाल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ७० हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरानजीक गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात ऊसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. या क्षेत्रात काही शेतकऱ्यांचा ऊस तुटून गेल्यामुळे त्यांचा सूसचा खोडवा राहिला होता. त्या शेतकऱ्यांनी आज सकाळी आपल्या शेतातील खोडवा व पाचट पेटवली. पाचटीला आग लावली असता ती वाऱ्यामुळे इतरत्र पसरू लागली. बघता बघता आग परिसरात पसरली. या घटनेची माहिती गावात वार्यासारखी पसरली. तसेच धुरांचेलॉट ५ किलो मीटर अंतरापर्यंत पसरल्यानंतर एकच गोंधळ उडाली. ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र जळाले आहे. त्यांनी लगेच आग लागलेल्या उसाच्या क्षेत्राकडे धाव घेतली.
या घटनेची माहिती पोलीस प्रशासन, अग्निशामक दलास मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोळेश्वर गावचे तलाठी सुजित थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत जळालेल्या उसाच्या क्षेत्राची पाहणी केली. पंचनामा करीत महसूल विभागास याची माहिती दिली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी तत्काळ दाखल होत घटनेची जळालेल्या ऊस क्षेत्राची पाहणी करीत माहिती घेतली. संबंधित अधिकारी व कमचाऱ्यांकडून जळालेल्या ऊस क्षेत्राची माहिती घेतली जात असून यामध्ये ७० हुन अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत माहिती दिली आहे.
ऊस क्षेत्रामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : सुजित थोरात
गोळेश्वर परिसरात आज लागलेल्या आगीत आतापर्यंत १०० हुन अधिक एकर ऊस जळाला आहे. या ठिकाणी उसाला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशामक दलास बोलवण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आग वाढतच चालली आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात ऊसाचे नुकसान झाले असल्याची माहिती गोळेश्वर गावचे तलाठी सुजित थोरात यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
नुकसान भरपाईबाबत कृषी अधिकाऱ्यांचे महत्वाचे विधान
गोळेश्वर येथील सुमारे १०० एकर क्षेतातील ऊसाचे आगीमुळे नुकसान झाले आहे. पिकाचे नैसार्गिगरीत्या नुकसान झाल्यास त्याला शासनातर्फे भरपाई दिली जाते. मात्र, शेतकऱ्यांनी आग लावल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे हि नुकसान भरपाई कोण देणार? असा सवाल तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना उपस्थित केला आहे.
पाच किलोमीटर परिसरात पडली राख
कराड शहरानजीक असलेल्या गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात काही शेतकऱ्यांनी ऊसाचा खोडवा पेटवला. यामध्ये सुमारे १०० हून अधिक एकर ऊस जळाला. या जळालेल्या उसाची राख वाऱ्याच्या साहाय्याने सुमारे ५ किलो मित्र क्षेत्रापर्यंत जाऊन पडली.
‘या’ शेतकऱ्यांच्या ऊसाला लागली आग
प्रतीक दिलीप जाधव, पृथ्वीराज मानसिंग जाधव, मानसिंग बापुसो जाधव, बाबासो पांडुरंग जाधव, धोंडीराम शंकर जाधव, शंकर कासजीनाथ जाधव, अभिजित विठल पाटील, हर्षल संजय सूर्यवंशी, सुधीर हणमंत सूर्यवंशी, शिवाजी पवार, सुरेश वसंतराव पवार, विश्वास शंकर जाधव, दौलत अण्णा इंगवले, जयश्री सुभाष पाटील, दत्तात्रय शिवाजी पवार, शिवाजी बापूराव पाटील, निखिल दिनकर पाटील, शंकर बापूराव जाधव, रामचंद्र खाशाबा पवार, जगन्नथ श्रीपती जाधव, दिनकर नानासो जाधव, अभिजित विठ्ठल पाटील, बाळासो जोतिराम जाधव, धनाजी जोतिराम जाधव, आनंदा केसू जाधव, दुष्यंत मोहन जाधव, जगदीश माधवराव जाधव, हिंदुराव तुकाराम माने, रुपाली सर्जेराव माने माने, सुवर्णा हिंदुराव माने, हिंदुराव तुकाराम माने, सुरेश वसंत पवार, शशिकांत वसंत पवार, सहकार दिनकर पवार, चंद्रकांत शंकर माने, गणेश शिवाजी पवार, दत्तात्रय शिवाजी पवार, सरजवराव तुकाराम माने, शाशकीत सहकार माने, निवास यशवंत माने, बबनराव शंकर माने, दीपक वसंत जाधव, प्रतीक दिलीप जाधव, दिलीप रामचंद्र जाधव, उत्तम रामचंद्र जाधव, बाळासो जोतिराम जाधव, धनाजी जोतिराम जाधव, सुनील जयसिग पाटील, सुरेश वसंतराव पवार, भुजंग बाबुराव पवार, सुरेश वसंत पवार, शशिकांत वसंत पवार, प्रकाश खाशाबा पवार, दीपक दादासो जाधव आदींसह अनेक शेतकऱ्याच्या उसाला आग लागल्यामुळे त्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे