पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून ५२,१०० क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे. पावसाचा जोर आणि आवक कमी झाल्याने आज दुपारी विसर्ग ४२,१००० क्युसेक्स केला जाणार आहे.
कोयना धरणात सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. एकूण ८६.३४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत सांडव्यावरून ५०,००० क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. दुपारी १२ वा. सांडव्यावरून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून ४०,००० क्युसेक्स करण्यात येणार आहे. तसेच आवक वाढल्यास विसर्गात वाढ केली जाणार आहे.
दुपारी सांडव्यावरील विसर्ग कमी केल्यानंतर धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक्स असेल. कोयना, कृष्णा नदी पात्राजवळील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.