पाटण प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पाऊस कमी पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घेतली आहे. परिणामी कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट धरण व्यवस्थापनाच्या वतीने रविवारी सायंकाळी बंद करण्यात आले. धरणात सध्या 72.22 TMC इतका पाणी साठा झाला असून 68.62 ट्क्के धरण भरले आहे.
पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह परिसरात मागील १५ दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे कोयनेसह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणांत चांगलाच पाणीसाठा वाढला. तर इतर छोटी धरणे भरली. पण, शनिवारपासून पावसाचा जोर कमी होत गेला. तर रविवारपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे धरणात कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी धरणसाठ्यातही सावकाशपणे वाढ होत आहे.
धरणातून सध्या 1050 क्युसेक्स पाणी सोडले जात असून धरणात पाण्याची आवक 18 हजार 505 क्युसेक्स होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात कोयनेला – 64 मिलीमीटर, नवजा – 105 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी
पहा-
Koyna Dam
Date : 31/07/2023
Time : 08:00 AM
Water level : 2132′ 05″ (649.961m)
Dam Storage:
Gross : 72.22 TMC (68.62%)
Inflow : 18,505 cusecs
Discharges
KDPH : 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River : 1050 Cusecs
Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna : 64/2730
Navaja : 105/3888
Mahabaleshwar : 82/3633
कराड पाटण तालुक्यातील महत्वाच्या पुल परिसरातील पाणीपातळी पहा
1) कोयना जुना पूल (कराड)
पाणी पातळी – 555.486(18’00”) इशारा (45ʼ) (धोका – 58ʼ4ʼʼ)
2) वारुंजी
पाणी पातळी – 554.337 (16’1″) विसर्ग (9803 क्युसेक) (इशारा – 43’10”)(धोका – 51ʼ8″)
3) हेळवाक पुल
पाणी पातळी – 574.30 मी. (ईशारा 576.80 मी.) (धाेका 578.60 मी)
4) केरा पुल पाटण
पाणी पातळी – 567.30 मी. (ईशारा 570.45 मी.) (धाेका 572.97 मी.)