पाटण प्रतिनिधी । दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो. शाश्वत विकासामध्ये बांबूचे महत्त्व आणि जागतिक अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि समुदायांसाठी त्याचे अनेक फायदे याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक बांबू दिनानिमित्ताने राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे पाटण तालुक्यात बांबू लागवडीसाठी शेतकरी व प्रशासनाने आघाडी घेतली आहे. बांबू लागवडीसाठी पाटणच्या विविध शासकीय विभागांकडे तालुक्यातील तब्बल १ हजार ३३४ प्रस्ताव प्राप्त आले आहेत.
अनियमित पार्जन्य, वादल, दुष्काळ आदी कारणांमुळे अडचणीत आलेल्या पारंपरिक शेतीसाठी पर्याय म्हणून शासनाने बांबू लागवड योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांस खर्च कमी व उत्पन्न अधिक आहे. बांबू जलदगतीने वाढणारे पीक असून, या पिकास कमी पाणी व खर्चही कमी येतो. पाटण तालुक्यात जागतिक बांबू, दिनाचे औचित्य साधून शासनाध्या सामाजिक वनीकरण, पंचायत समिती व कृषी विभागाकडे तालुल्यातून एकूण १ हजार ३३४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडे ४९.८६ हेक्टरसाठी ९४ प्रस्ताव, पंचायत संगितीकडे १ हजार २०० हेक्टरसाठी १ हजार ८० प्रस्ताव तर शासनाच्या कृषी विभागाच्या १६० हेक्टरसाठी १६० प्रस्ताव प्राप्त झाले असून, यामधील बहुतांशी प्रस्तावांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे.