कराड प्रतिनिधी । मुख्यमंत्री बहिण योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील १ लाख ४३ हजार ६८२ बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे १०७ कोटी ७६ लाख रुपये जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागणार असल्याने शासनाने ऑक्टोबर बरोबरच नाहेंबर महिन्याचेही आगाऊ पैसे बहिणींच्या. खात्यात जमा केले आहेत. दिवाळीच्या तोंडावर एकरकमी ३ हजार रूपये जमा झाल्याने बहिणींच्यात आनंदाचे वातावरण आहे. योजनअंतर्गत प्रत्येक बहिणींला आत्तापर्यंत साडे सात हजार रूपये मिळाले आहेत.
महायुती सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला दिड हजार रूपये देण्यात येत आहेत. दिड हजार रूपये देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील १ लाख ५२ हजार ६५ महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. तालुका व जिल्हास्तरीय समितीकडून छाननी केल्यानंतर यातील १ लाख ५० हजार ८१.
पात्र बहिणींच्या अर्जाना मंजुरी देण्यात आली होती. यातील सुमारे ६ हजार ३९९ बहिणींच्या बँक खात्याला आधार सिडींग नसल्याने त्यांचे पैसे अद्याप येणे बाकी आहेत. तर १ लाख ४३ हजार ६८२ बहिणींच्या खात्यात १०७ कोटी ७६ लाख १५ हजार रूपये जमा करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात या योजनेची घोषणा केल्यानंतर त्याच महिन्यापासून बहिणींना पैसे देण्याचे जाहीर करण्यात आले. प्रथम नारीशक्ती अपच्या माध्यमातून ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.
तसेच ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज दाखल केलेल्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रूपये एकरकमी जमा करण्यात आले होते. तर गेल्या महिन्यात सप्टेंबर महिन्याचे दिड हजार रूपये प्रत्येक बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. सध्या महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष व नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. १३ ऑक्टोंबर पर्यंत अचारसंहिता लागू होण्याचे संकेत देण्यात येत आहेत.